Bigg Boss Marathi 6 
बिग बॉस

Bigg Boss Marathi 6: विजेत्याचा ख्वाब मोडला? घराबाहेर जाणाऱ्या दावेदाराने प्रेक्षकांना दिला धक्का!

Bigg Boss Marathi 6 सध्या रंगतदार टप्प्यावर पोहोचला आहे. पाच आठवडे पूर्ण झाल्यानंतर स्पर्धकांचे खरे रूप आता स्पष्ट दिसू लागले आहे.

Published by : Riddhi Vanne

Bigg Boss Marathi 6 सध्या रंगतदार टप्प्यावर पोहोचला आहे. पाच आठवडे पूर्ण झाल्यानंतर स्पर्धकांचे खरे रूप आता स्पष्ट दिसू लागले आहे. त्यामुळे यंदाच्या आठवड्यात कोण बाहेर पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा रंगली आहे. यावेळी एक नव्हे तर दोन जणांना घराचा निरोप द्यावा लागू शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. आजच्या ‘भाऊच्या धक्का’पूर्वीच काही नावं पुढे येत आहेत.

नॉमिनेशनमध्ये Raqesh Bapat राकेश बापट, Karan Sonawane करण सोनवणे, Prabhu Shelkeप्रभू शेळके, Prajakta Shukre प्राजक्ता शुक्रे, Sachin Kumavat सचिन कुमावत आणि Ayush Sanjeev आयुष संजीव यांचा समावेश होता. यापैकी दोन स्पर्धकांचा प्रवास संपल्याची चर्चा रंगली आहे.

जर डबल एलिमिनेशन खरे ठरले, तर घरातील समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. काहींच्या मते, अलीकडे कमी सक्रिय दिसणाऱ्या आयुषला कमी मतांमुळे बाहेर पडावे लागले. तर करणच्या बाबतीत ‘सिक्रेट रूम’ची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आता खरं चित्र आजच्या भागातच स्पष्ट होणार आहे. प्रेक्षकांचे लक्ष ‘भाऊच्या धक्का’कडे लागले आहे.

थोडक्यात

  • Bigg Boss Marathi 6 सध्या रंगतदार टप्प्यावर पोहोचला आहे.

  • पाच आठवडे पूर्ण झाल्यानंतर स्पर्धकांचे खरे रूप आता स्पष्ट दिसू लागले आहे.

  • त्यामुळे यंदाच्या आठवड्यात कोण बाहेर पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा